मुंबई | Asia Cup 2022 – आशिया कपदरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याला दुखापत झाल्यामुळे तो आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यासंदर्भात बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली आहे.
रवींद्र जडेजाला दुखापत झाल्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मात्र त्याच्या जागी आता युवा खेळाडू अक्षर पटेलला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. आशिय चषकासाठी अक्षर पटेलला अतिरिक्त खेळाडू म्हणून स्थान देण्यात आलं होतं. आता तो लवकरच दुबईसाठी रवाना होणार आहे.
दरम्यान, आशिया चषकात रवींद्र जडेजाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 35 धावांची पारी खेळत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसंच त्याने हाँगकाँगविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही चार षटकात केवळ 15 धावा देत एक विकेट घेतली होती.