अखेर 500 वर्षाचा वनवास संपला! प्रभू श्रीराम अयोध्येनगरीत विराजमान, विधीवत प्रतिष्ठापना

Ram TempleRam Temple

अयोध्या : (Ayodhya Pran Pratishtha ceremony) संपूर्ण देशाचं स्वप्न आज पूर्ण झालं. अखंड भारत ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होता तो क्षण आज याचि देही, याचि डोळा अवघ्या देशानं अनुभवला. न भूतो न भविष्यती अशा अभूतपूर्ण सोहळ्यात प्रभू श्रीरामाची अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. 12.29 या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली.

तब्बल 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम विधीवत राम मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुष्ठान पूर्ण केलं. यावेळी हेलिकॉप्टरमधून पृष्पवृष्टी करण्यात आली. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली होती. कलाकार, खेळाडूंसह देशभरातील नागरिक अयोधामध्ये आले होते. प्राणप्रतिष्ठावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात उपस्थित होते. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा हा आनंदाचा सोहळा जगभरातील लोकांनी ‘याची देही याची डोळा पाहिला. हा सोहळा नयनरम्य होता, उपदेशात्मक होता, ऊर्जात्मक होता. जीवनाला दिशा व जगण्याला उद्देश देणारा ठरला.

तो ऐतिहासिक क्षण आलाच… प्रभू श्रीराम हे मंदिरात विराजमान झाले, ज्या क्षणाची सारे राम भक्त गेल्या 500 वर्षांपासून वाट पाहत होते तो क्षण अख्ख्या देशाने अनुभवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी संपूर्ण अयोध्या ही राममय झाली आहे.

Prakash Harale:
whatsapp
line