“हाता-पायाला काळा धागा बांधण्याची गरज कारण…”, आयुष्यमान खुरानाने मुंबईकरांना दिला ‘हा’ सल्ला

मुंबई | Ayushmann Khurrana Gave Advice To Mumbaikars – बाॅलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असतो. तसंच तो सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रिय असतो. त्याचे आगामी चित्रपट, गाणी, खाजगी आयुष्य, परदेशी ट्रिप यासर्वांचे अपडेट तो त्याच्या चाहत्यांना नेहमी देत असतो. सध्या तो ‘डॉक्टर जी’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. या आगामी चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी त्याने ‘डॉक्टर्स डे’च्या खास शुभेच्छा दिल्या होत्या. नुकताच आयुष्मानने एक नवा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने मुंबईकरांना खास सल्ला दिला आहे.

आयुष्यमान खुरानाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, “मी विमानात सीट 1A वर बसलो आहे. पुन्हा मास्क लावण्याची वेळ आली आहे. मुंबईमध्ये खूप जणांना व्हायरल इन्फेकशन झालं असल्याचं समजलं. यादरम्यान मी एक ग्लास कोमट पाणी पिऊ इच्छितो. तुम्ही त्यात काळी मिरी पण घालू शकता. हाता-पायाला काळा धागा बांधण्याची गरज आहे, कारण आपल्याला नजर लागली आहे.’ असा सल्ला आयुष्यमानने मुंबईकरांना दिला आहे.

दरम्यान, आयुष्यमान खुराना ‘डाॅक्टर जी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच रकुलप्रीत आणि आयुष्मान स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक अनुभूती कश्यप करत आहेत. आयुष्मान आणि रकुल व्यतिरिक्त या चित्रपटात शेफाली शाह देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Sumitra nalawade: