नवी दिल्ली – Azadi Ka Amrit Mahotsav : येत्या १५ ऑगस्टला देशभरात स्वातंत्र्यच्या अमृतमोहोत्सवानिमित्त जल्लोषात ध्वजारोहण केलं जाणार आहे. यासाठी केंद्र सरकार कडून देखील जय्यत तयारी सुरु आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमांतर्गत ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवली जाणार आहे. ऑगस्ट मध्ये १३ तारखेपासून १५ तारखेपर्यंत ध्वज फडकावण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
देशाला स्वतंत्र मिळून यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने सरकारकडून विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी आणि नागरिकांना स्वतःच्या घरी देखील ध्वजारोहण करता येणार आहे. ध्वज संहिता २००२ मध्ये २० जुलै २०२२ च्या आदेशानुसार असा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार ध्वजसंहितेत काही बदल करण्यात आले आहेत.
दरवर्षी ध्वज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावला जात असतो. मात्र, नवीन नियमांनुसार तिरंगा २४ तास फडकावत येणार आहे. त्याचबरोबर पॉलिस्टर पासून तयार करण्यात आलेला आणि मशीन वर तयार करण्यात आलेला तिरंगा देखील फडकावत येणार आहे.