ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प बाबा महाराज सातारकर काळाच्या पडद्याआड, वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Baba Maharaj Satarkar Passed Away | ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचं निधन झालं आहे. त्यांनी नवी मुंबईतील नेरूळ येथे अखेरचा श्वास. तर उद्या (27 ऑक्टोबर) नेरूळ येथे बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होणार आहेत.

बाबा महाराज सातारकर यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर आज दुपारी 3 नंतर बाबा महाराज सातारकर यांचं पार्थिव नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये ठेवण्यात येणार आहे.

बाबा महाराज हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार होते. त्यांचं किर्तन ऐकण्यासाठी फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातून लोक येत होते. तसंच बाबा महाराज यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे कीर्तन आणि ज्ञानेश्वरी यावर घालवलं आहे. पण अलिकडे त्यांचं वय झाल्यामुळे बाबा महाराज किर्तनासाठी उभे राहत नव्हते, त्यामुळे त्यांची ही परंपरा त्यांचा नातू पुढे नेताना दिसत आहे.

Sumitra nalawade: