मुंबई – Babar Azam breaks King Kohli’s record | भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा आणखी एक विक्रम पाकिस्तानच्या बाबर आझमने मोडला आहे. कर्णधार म्हणून सर्वात वेगाने 1000 हजार धावा काढण्याचा विक्रम बाबरने आपल्या नावावर केला आहे.
विराट कोहलीने 2017 साली इंग्लंडविरूद्धच्या द्विपक्षीय मालिकेमध्ये 17 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. मात्र बाबर आझमने ही कामगिरी अवघ्या 13 डावांमध्ये फत्ते केली आहे. बाबरने 13 डावांमध्ये सहा शतके आणि तीन अर्धशतके केली आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 103.71 इतका आहे.
दरम्यान, बाबर आझमने आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. त्याने सलग तीन शतके करण्याची कामगिरी दोनवेळा केली आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये असा पराक्रम करणारा आझम हा पहिला फलंदाज ठरला आहे.