मुंबई (BACCHU KADU VS RAVI RANA) : आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद वाढतच चाललेला आहे. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर पैसे घेऊन शिंदे – फडणवीस सरकारला पाठींबा दिल्याचा आरोप केला आहे. त्यावरून बच्चू कडू यांचा पारा वाढलेला दिसत आहे. सकाळी बच्चू कडू यांनी एक तारखेपर्यंत रवी राणा यांनी केलेले आरोप सिद्ध केले नाहीत तर मी शांत बसणार नाही. अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर ‘मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील मी त्यांच्याकडून किती पैसे घेतले हे विचारण्यासाठी नोटीस देणार आहे. या आरोपांमुळे माझ्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित झाला आहे. माझी आमदारकी गेली तरी चालेल मात्र, या प्रकरणाचा छडा मला लावायचा आहे.’ अशी संतप्त प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या विरोधात दिली आहे.
दरम्यान, या दोघांतील वाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दखल देण्याची विनंती बच्चू कडू यांनी केली होती. भाजपचे गिरीश महाजन यांनी देखील दोघांतील वाद सोडव्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसत आहे. गिरी महाजन यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले. “बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वाद नाहीये. मी त्या दोघांशीही कालपासून दोनदा बोललो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यास्थित त्यांच्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ते दोघेही आता याप्रकरणावर बाहेर बोलणार नाहीत.” अशी प्रतिक्रिया गिरी महाजन यांनी दिली आहे.
View Comments (0)