सरकारी कामात अडथला आणल्यानं बच्चू कडू यांना न्यायालयाने ठोठावला दंड

अमरावती : अचलपूर मतदारसंघातील प्रहार संघटनेचे आमदार आणि महाविकास आघाडी सरकार मध्ये राज्यमंत्री राहिलेले बच्चू कडू यांना येथील सत्र न्यायालायाने सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे दंड ठोठावला आहे. २००५ मधील एका घटनेप्रकरणी त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे.

८ मे २००५ रोजी तत्कालीन आमदार बच्चू कडू यांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर घागर मोर्चा काढण्याचे आयोजन केले होते. मात्र त्याच वेळी आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक सुरु होती. मोर्चा कार्यालयावर जात असताना पोलिसांनी मोर्चेकारांना अडवले. बच्चू कडू देखील या मोर्चात सहभागी झालेले होते. कार्यालयाच्या गेटवर त्यांना पोलिसांनी अडवले.

मोर्चा आयुक्त कार्यालयावर जात असताना बच्चू कडू आणि पोलिसांत बाचाबाची झाली होती. त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली. जिल्हा व सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना २० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

Sumitra nalawade: