“मोदींमुळे मंदिर मशिदीचा प्रश्न सुटला, पण गडकरी पंतप्रधान असते तर … ” राज्यमंत्र्यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

Bachhu Kadu on Narendra Modi | केंद्रीय मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी (BJP central minister Nitin Gadakari) हे त्यांच्या ‘बोले तैसा चाले’ वृत्तीमुळे चांगलेच ओळखले जातात, विरोधकांकडूनही (opposition) त्यांच्या कामाची वाहवा होत असते. अशातच असता महाविकास आघाडीतील राज्य मंत्री बच्चू कडू (mahavikas aghadi, Bacchu Kadu) यांनी नितीन गडकरी यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. मात्र याचवेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीकाही केली आहे.

सध्या देशभर मंदिर आणि मशिदींवरून (gyanwapi mashid) वाद सुरु आहेत. राम मंदिराचा (ram mandir) प्रश्न सुटल्यानंतर आता वेगवेगळ्या मशिदी आणि मंदिरांवरून वातावरण तापलेले आहे. त्यावरून बच्चू कडू यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. (state minister Bacchu Kadu commented on PM Narendra Modi and Nitin Gadakari) त्याचबरोबर नितीन गडकरी यांचं कौतुकही केलं आहे. ते म्हणाले, “नरेंद्र मोदींमुळे मंदिर-मशिदीचा प्रश्न सुटला, पण नितीन गडकरी पंतप्रधान असते तर रोजी-रोटीचाही प्रश्न सुटला असता” असं धडक वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील संग्रामपूर (sangrampur) येथे बच्चू कडू रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यासाठी आलेले असताना बोलत होते. नरेंद्र मोदींवर टीका करत ते म्हणाले, महागाई गगनाला भिडली आहे. (inflation) मात्र देशाच्या पंतप्रधानांना त्याचं काही घेणं देणं नाही. ४०० रुपयांना मिळणारे गॅस सिलेंडर आता हजाराच्याही वर जाऊन पोहोचले आहे.

Dnyaneshwar: