मुंबई : (Bachhu Kadu On Ravi Rana) अमरावतीचे शिंदे-फडणवीस सरकारचे अपक्ष आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातल्या वाद अधिक तिव्र होताना दिसत आहे. त्यापुर्वी माझ्या कार्यकर्त्यांची भावना अतिशय तीव्र असून तोडफोड करुन बाहेर पडण्याची कार्यकर्त्यांची मागणी असल्याचा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केलाय.
रवी राणा अतिशय नीच पद्धतीने माझ्यावर बोलला आहे. नीच आरोप करुन माझी बदनामी केलीय आहे. मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर एवढंच सांगेन माझी बदनामी भरुन द्या, असं बच्चू कडू म्हणाले. राणा-कडू वाद आज निकाली निघण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनाही आज मुंबईला बोलावून घेऊन त्यांना समज देणार आहेत. दोघांचंही म्हणणं ऐकून शिंदे-फडणवीस वादावर तोडगा काढतील.
बच्चू कडू यांनी ‘खोके’ घेतल्याचा आरोप करुन रवी राणा यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यानंतर गेली चार दिवस बच्चू कडू-रवी राणा यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या कलगीतुऱ्याने आता वादाचं शेवटचं टोक गाठलं आहे. त्यामुळे दोघांच्या वादात सरकारची बदनामी नको म्हणून शिंदे-फडणवीसांनी त्यांना दोघांनाही भेटीला बोलावलं असून वाद निकाली निघण्याची आशा आहे.