“जेवणाचं आमंत्रण हे जेवल्याशिवाय…”, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडूंची मिश्किल प्रतिक्रिया

मुंबई | Bacchu Kadu – सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे. हा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अशातच बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी यासंदर्भात मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. सध्या त्यांची ही प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे.

यावेळी बच्चू कडू म्हणाले की, “जेवणाचं आमंत्रण हे जेवण केल्याशिवाय खरं नसतं. घोडामैदान जवळ आहे. जरी मंत्री झालो नसलो तरी काम करतोय. पण मंत्री झालो तर आणखी वेगानं काम करेनं.”

“आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे. हा विस्तार तातडीनं झाला पाहिजे, कारण प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र पालकमंत्री मिळणं आवश्यक आहे ही जनतेची मागणी आहे”, असंही बच्चू कडू म्हणाले.

Sumitra nalawade: