“…तर मी नार्को टेस्ट करायला तयार”; बजरंग पुनियानं स्विकारलं बृजभूषण सिंह यांचं आव्हान

नवी दिल्ली | Wrestlers Protest – कुस्ती महासंघाचे प्रमुख आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी नार्को टेस्ट (Narco Test) करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत नार्को टेस्ट करण्यासाठी तयार असल्याचं जाहीर केलं होतं. पण त्यासाठी त्यांनी कुस्तीपटूंना एक अट घातली होती. कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि विनेश फोगाट यांची देखील नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी अट बृजभूषण शरण सिंह यांनी घातली होती. तर आता बजरंग पुनियानंही त्यांना खोचक शब्दांत प्रत्युत्तर देत त्यांचं आव्हान स्विकारलं आहे.

यापूर्वीच आम्ही नार्को टेस्टबाबत सांगितलं आहे, ते तर आत्ता बोलत आहेत, असं म्हणत बजरंग पुनियानं नार्को टेस्ट करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. पण त्यानं हे आव्हान स्विकारत बृजभूषण शरण सिंह यांना एक अट घातली आहे.

जर कुस्ती महासंघाचे घोटाळे मोजायचे असतील तर मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. माझ्यासोबत जितेंद्र (महिला कुस्तीपटूंचे मुख्य प्रशिक्षक), विनोद तोमर, फिजिओ धीरेंद्र प्रताप यांचीही नार्को टेस्ट करावी. तसंच गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या मुली बृजभूषण यांच्यावर आरोप करत आहेत, त्या तर आधीपासूनच म्हणत आल्या आहेत की, आमचीही नार्को टेस्ट करा म्हणून. त्यामुळे त्या देखील नार्को टेस्ट करायला तयार आहेत, असंही बजरंग पुनिया म्हणाला.

Sumitra nalawade: