बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरील, त्यांनीच लावलेलं झाड कोसळलं!

मुंबई : (Balasaheb Thackeray Planted Tree was uprooted) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण जागी करणारे दादर येथील शिवाजी पार्कमधील यांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले आहे. विशेष म्हणजे, कोसळलेले गुलमोहराचे झाड हे बाळासाहेबांनीच लावलेले होते. बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क यांचे नाते अख्या महाराष्ट्राला माहिती आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून प्रत्येक वर्षी दसरा मेळाव्याला बाळासाहेब शिवाजी पार्कवर सभा घ्यायचे.

याच शिवाजी पार्कच्या मैदानावरती बाळासाहेबांनी आपल्या हातांनी एक गुलमोहराचे झाड लावलं होतं. तर बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे स्मृतीस्थळ याच झाडाच्या जवळ उभारण्यात आले होते. रविवारी रात्री मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंनी लावलेले गुलमोहराचे झाड कोसळल्याची माहिती येथे काम करणाऱ्या व्यक्तीने किशोरी पेडणेकर यांना दिली.

हे झाड पडल्याने स्मृतीस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सकाळीच स्मृतीस्थळावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर पेडणेकर यांनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळाला भेट देत घटनेची पाहणी केली. कोसळून पडलेले गुलमोहराचे झाड शिवाजी पार्कवरतीच पुनर्रोपीत करण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.

Prakash Harale: