‘…बाळासाहेब ठाकरेंच्या चिरंजीवांनी साहेबांचं हिंदुत्व मिठी नदीत बुडवून दाखवलं’- चंद्रकांत पाटील

पुणे : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना दोन गटांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली शनिवारी अटक करण्यात आली. त्यानंतर आता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांच्या जामीनावर आता २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयानं त्यांच्या जामिनावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिल्याने त्यांना कारागृहात पाठवण्यात आले आहे. यावरुन भाजपा नेते आक्रमक झाले असून त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसंच यासंदर्भात आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

“उत्तम! हिंदू धर्मियांचा पवित्र “हनुमान चालिसा” म्हणणे हा शिवसेनेच्या राज्यात राजद्रोहाचा गुन्हा ठरला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांनी साहेबांचं हिंदुत्व मिठी नदीत “बुडवून दाखवलं”!” असे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Sumitra nalawade: