“राज ठाकरेंमध्ये तो लढाऊबाणा राहिलेला नाही…”, बाळासाहेब थोरात यांची टीका

मुंबई | Balasaheb Thorat On Raj Thackeray – गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरेंसोबत भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे भाजप आणि मनसेमध्ये युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याच संदर्भात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “आगामी काळात भाजप आणि मनसे यांच्यात युती होऊ शकते. मात्र, आम्ही ज्या राज ठाकरेंना ऐकलं आणि पाहिलं आहे तो लढाऊबाणा आत्ताच्या राज ठाकरेंमध्ये राहिलेला नाही”, अशा शब्दांत थोरात यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

पुढे बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या सध्याच्या रणनीतीवर हल्लाबोल केला आहे. “काहीही करा पण सत्ता आणा हेच भाजपचं सध्याचं धोरण आहे. याचा अनुभव नुकताच अमित शाहंच्या मुंबई दौऱ्यातील भाषणातून दिसून आलेला आहे. मात्र, सत्तेपासून भाजपला रोखण्याचे प्रयत्न मविआच्या माध्यामातून सुरूच राहतील असं थोरातांनी स्पष्ट केलं आहे. तसंच मविआ आजही एकत्रच असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Sumitra nalawade: