विजयानंतर बाळासाहेब थोरातांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, ‘भाजपने मतदारांना प्रलोभने दाखवली… “

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आजच लागला लागला आहे. निवडणुकीत भाजपचा पराभव करत काँग्रेसच्या उमेदवारा जयश्री जाधव यांनी १९ हजार मतांनी बाजी मारली आहे. या निएड़णुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होत कारण, हि निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशापद्धतीने बघितली जात होती.

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने मतदारांना अनेक प्रलोभने दाखवून मत मिळवण्याचा प्रयत्न केला, धाकधपटशा करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोल्हापूरच्या जनतेने निर्भीडपणे मतदान केलं. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आहे.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचा आणि महाविकासआघाडीचा विजय झालाय. काँग्रेसचे नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, त्यांना साथ देणारे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेतेमंडळी व कार्यकर्ते यांनी ज्या पद्धतीने एकत्रित काम केलं त्याचं निश्चितपणे कौतुक केलं पाहिजे. पुढील कालखंडात या राज्याच्या राजकारणाची दिशा कशी राहील हे ठरवणारा हा विजय आहे.”

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असताना यापूर्वी या मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणुकीत उतरलेले आणि आता भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांना भाजपने उमेदवारी दिली होती. गेले काही दिवस मविआ आणि भाजपाच्या राज्यभरातील प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडत राहिल्या. त्यामुळे आता या निकालाकडे सर्वाचेंच लक्ष लागले होते.

Dnyaneshwar: