पुणे : बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला जाणारा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार यावर्षी ठाण्याचे पं. मुकुंद मराठे याना जाहीर झाला आहे. बालगंधर्वांच्या ५५ व्या स्मृतिदिनी १५ जुलै रोजी बालगंधर्व रंगमंदीरात होणा-या समारंभात विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ५१ हजार रु. रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, बुलडाणा नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्याधिकारी शिरीष देशपांडे व कर – सगार विजयकांत कुलकर्णी उपस्थित राहतील.
मंडळाचे अध्यक्ष सुश साखवळकर व कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी यानी ही माहिती दिली. या कार्यक्रमात रंगगंधर्व या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार असून त्यानंतर रंगबहार या नाट्यसंगीताच्या मैफलीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये डॉ. राजा काळे, पं. उपेंद्र भट, बकुल पंडित, मुकुंद मराठे, अभिनेत्री गात, अभिषेक काळे, गायत्री कुलकर्णी, रविंद्र कुलकर्णी, प्राजक्ता काकतकर व सुश साखवळकर हे कलाकार सहभागी होतील. बालगंधर्व मंडळातर्फ शनिवार १६ जुलैला देणे गंधर्वांचे हा कार्यक्रम असून रविवार १७ जुलैला संत कान्होपात्रा हे संगीत नाटक सादर केले जाणार आहे. हे तीनही कार्यक्रम विनाशुल्क असून रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे.