“चित्रा वाघ तुम्ही संजय राठोडांना राखी बांधा अन्यथा, आम्ही रस्त्यावर उतरू”

मुंबई Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर चाळीस दिवसांनी शिंदे सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. सुरुवातीला मंत्रिमंडळ विस्तार नाही म्हणून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळात एकही महिलेला स्थान नाही आणि काही आमदारांवर मोठे गुन्हे दाखल असून त्यांना क्लीन चीट मिळालेली नसताना देखील मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे. यावरून विरोधकांकडून सरकारचा निषेध केला जात आहे.

मंत्रिमंडळात एकही महिलेला स्थान न दिल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गुन्हे दाखल असताना त्यांना मंत्रिमंडळात घेतल्यामुळे देखील सरकारवर टीका केली जात आहे. राठोडांना मंत्रिमंडळात घेतल्यामुळे विरोधकांकडूनच नाही तर भाजप नेत्यांकडूनही टीका केली गेली आहे. भाजपच्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय राठोड मंत्री असताना त्यांना चांगलेच धारेवर धरलेले होते. आता शिंदे – फडणवीस सरकारमध्ये देखील राठोडांना मंत्रिपद दिल्यामुळे चित्रा वाघ यांनी सडकून टीका करत नाराजी व्यक्त केली आहे.

चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर टीका केल्याने बंजारा समाज आक्रमक झाला आहे. संजय राठोड यांनीही त्यांना कायदेशीररित्या क्लीनचीट मिळाल्यानंतर मंत्रीपदाची शपथ घेतली असल्याची माहिती दिली आहे. यापुढे त्या प्रकरणावर कोण काहीही बोललं तर थेट कायदेशीर पाऊल उचलण्यात येईल असा इशारा राठोड यांनी दिला आहे.

चित्रा वाघ यांच्या टीकेमुळे बंजारा समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा बंजारा समाजाकडून देण्यात आला आहे. चित्रा वाघ यांच्या टीकेमुळे संजय राठोडांवर टीका करण्यात येत आहे. मंत्रीपदाची शपथ घेतलेला दिवस बंजारा समाजासाठी आनंदाचा दिवस होता. मात्र बंजारा समाजाच्या राठोडांवर चित्रा वाघ यांच्याकडून खोटे आरोप करण्यात आले. आता चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना राखी बांधावी आणि त्यांच्यावरील टीका थांबवावी नाहीतर संपूर्ण बंजारा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा बंजारा समाजाने दिला आहे. प्रत्रकार परिषद घेऊन बंजारा समाजाने सांगितले आहे.

Dnyaneshwar: