पुणे : वेळ सायंकाळी पाचची आणि महापालिकेत एकच मोठा धमाका होतो आणि आग लागते. अग्निशमन दल पाचारण होताच दलाचे दोन फायर टेंडर, एक रेस्क्यू व्हॅन, एक देवदूत वाहन, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म व दोन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचतात. नंतर सुरु होते प्रत्यक्ष कार्यवाही.
ज्यामध्ये जवान आग विझवण्याचे कार्य करत असतानाच दुसऱ्या व चौथ्या मजल्यावर अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढतात व दुसरीकडे जखमी झालेले नागरिक आणि फुटलेले सिलिंडर जवान बाहेर घेऊन येत आग पूर्ण विझवितात त्याचवेळी जखमी नागरिकांना प्राथमिक उपचार देत रुग्णवाहिकेतून दवाखान्यात पाठविण्यात येते. संपूर्ण इमारत अंदाजे आठ मिनिटात योग्यरीत्या कोणालाही इजा न होता रिकामी करत ही सर्व कार्यवाही दलाचे अधिकारी व जवान यांनी अवघ्या दहा मिनिटात पूर्ण करतात. सदरील नागरिकांसाठी हेच वैशिष्टपूर्ण व अभिमानस्पद आहे.
जागतिक आपत्ती व्यवस्थापन दिनानिमित या मॉकड्रीलमध्ये महापालिकेचे आपत्ती व्यस्थापन कक्ष विभाग व त्यांचे प्रमुख श्री गणेश सोनुने आणि सुरक्षा विभाग व त्यांचे प्रमुख श्री. राकेश विटकर यांचे सहकार्य झाले. तसेच प्रत्यक्षात जर अशी घटना घडली तर आपण खरोखरच किती जागरूक आहोत हे या निमित्ताने तपासण्याची संधी मिळाली. या मॉकड्रील मुळे झालेल्या तसदीबद्दल अग्निशमन दल दिलगिरी व्यक्त करत शहरातील इतर सरकारी कार्यालय व अन्य संस्था यांच्यामध्ये जागरूकता व जबाबदारी निर्माण व्हावी, या दृष्टीकोनातून हे मॉकड्रील आयोजित केले होते.