सावधान! राज्याची राजधानी मुंबई ठरतेय कोरोना हॉटस्पॉट; वाचा आजची आकडेवारी!

chandrakant patil 1chandrakant patil 1

मुंबई : पुन्हा मोठ्या प्रमाणत कोरोना पसरत असल्याचं पाहायला मिळत असून गेल्या 24 तासांत राज्यात 2,701 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1,327 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा आकडा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर गेल्या २४ तासात एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. परंतु मुंबईमध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्यामुळे चिंता वाढली आहे.

तसंच गुरुवारी आढळलेल्या कोरोना बाधितांच्या तुलनेत आजच प्रमाण सुमारे 10 टक्क्यांनी वाढले आहे. आज एकट्या मुंबईत 1,765 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.00 टक्क्यांवर झाले असून, मृत्यूदर 1.87 टक्के इतका झाला आहे. दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आता प्रशासन आणि नागरिकांच्या चिंतेत देखील भर पडली आहे.

दरम्यान, भारतामध्ये नवीन कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असून सध्या देशात ४० हजारहून रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तसंच १० जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर कोरोनातून बरे होणाऱ्यांचा दर 98.69 टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे आता प्रशासन कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सर्वानी खबरदारी घेण्याची आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्यास सांगण्यात आलं आहे.

Nilam:
whatsapp
line