जलवा दाखवणार? विश्वसुंदरी मानुषी छिल्लर हिला मोठी संधी; ‘या’ स्पर्धेत करणार भारताचं प्रतिनिधित्व

beauty world Manushi Chhillar News : मानुषी छिल्लर ही भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. मानुषीने २०१७ ला मिस वर्ल्डचा किताब पटकावून संपूर्ण जगाचं लक्ष तिच्याकडे वळवलं. त्यानंतर आता लंडन वीक 2023 च्या फॅशन वीकमध्ये मानुषी भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

मानुषी छिल्लर म्हणते “जेव्हा आपण स्पर्धांमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण काय तयारी करावी आणि स्वतःला लोकांसमोर कसे सादर करावे यावर लक्ष केंद्रित करतो. पण जेव्हा स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाते जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या मातृभूमीचे प्रतिनिधित्व करताना येणारी जबाबदारी आणि अभिमान याची मला जाणीव आहे.”

मानुषी छिल्लरसाठी हा एक फॅशन वीक नसून भारताला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याची गोष्ट आहे. देशाची समृद्ध संस्कृती, विविधता आणि प्रतिभा जगासमोर दाखवण्याबद्दल मानुषी आग्रही आहे. राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणे हा एक सन्मान आहे, जो मोठ्या जबाबदारीसह येतो असं मानुषीला वाटतं.

Prakash Harale: