अनुष्काच्या आधी विराटला आवडायची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, जिचे आजही आहेत लाखो चाहते

virat kohli 1 1virat kohli 1 1

मुंबई | Virat Kohli Birthday – किंग कोहलीचा (King Kohli) आज (5 नोव्हेंबर) 34वा वाढदिवस आहे. त्यामुळे विराटचे चाहते त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करताना दिसत आहेत. त्याच्यावर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. चाहत्यांसोबतच विराटला अनेक दिग्गजांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. विराट सध्या भारतीय क्रिकेट संघासोबत ऑस्ट्रेलियात आहे जिथे टी-20 विश्वचषक 2022 खेळला जात आहे. तसंच विराटने बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) लग्न केलं आहे. मात्र, अनुष्काच्या आधी विराटला बाॅलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आवडायची, याबाबत त्यानं स्वत: एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

विराट कोहलीला पत्नी अनुष्काच्या आधी एक बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आवडायची. याबाबत विराटनं स्वत: एका मुलाखतीत सांगितलं आहे. एका मुलाखतीत विराटला कोणती अभिनेत्री आवडायची असं विचारण्यात आलं होतं. त्यावर कोहलीनं सांगितलं की, त्याला लहान वयातच करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आवडायची.

दरम्यान, विराट आणि अनुष्का एका जाहिरातीच्या शूटदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर विराटनं 2017मध्ये अनुष्कासोबत लग्न केलं. तसंच आता त्यांना वामिका नावाची एक गोड मुलगी आहे. वामिकाचा जन्म गेल्या वर्षी 11 जानेवारीला झाला होता.

दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळून या खेळात आपली कारकीर्द घडवणारा विराट आज आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्या युगातील जगातील महान फलंदाजांमध्ये त्याची गणना होते. त्यानं एकट्यानं टीम इंडियाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. सध्या त्यानं टी-20 वर्ल्ड कपमध्ये शानदार फलंदाजी केली असून आतापर्यंत 4 पैकी 3 सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत.

Sumitra nalawade:
whatsapp
line