नवी दिल्ली : (Beneficiaries of PM Kisan Yojana do KYC) पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेच्या वर्षात तिन टप्प्यांत मिळणाऱ्या हप्त्यांसाठी शासनाने केवायसी व्हेरीफिकेशम बंधनकारक केलं आहे. ३१ जुलैपर्यंत पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी केवायसी करण्याबाबतची नोटीस शासनाने जारी केली आहे.
दरम्या, ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम योजनेच्या ११ हप्त्यांचे पैसे खात्यात टाकण्यात आले आहे. या योजनेमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना सहा हजार रूपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही धनराशी दोन हजार रूपयांच्या तीन टप्प्यांमध्ये दिली जात आहे. मात्र, या योजनेत अनेक असे लोक आहेत जे शेतकरी नसूनही या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा फसवणूकदारांना आळा घालण्यासाठी पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासनाने केवायसी बंधनकारक केलं आहे. ३१ जुलैपर्यंत पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी केवायसी करण्याबाबतची नोटीस शासनाने जारी केली आहे.
तुमच्या मोबाईलवरून करू शकता केवायसी, जाणून घ्या सगळ्यात आधी पीएम किसाच्या pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर जा. यानंतर होमपेजवर फॉर्मर्स कॉर्नरच्या e-KYC टॅबवर क्लिक करा. यावर क्लिक करताच तुम्हाला नवीन टॅबवर आधार नंबरची माहिती विचारली जाईल. आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर वन टाईम ओटीपी येईल. हा ओटीपी सबमिट करताच तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. मोबाईलवर शक्य नसल्यास तुम्ही जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊनही केवायसी करू शकता.त्यासाठी तुम्हाला १७ रूपये ई-केवायसी फिस द्यावी लागेल.