मुंबई | Pre Wedding Shoot Outfits – कोणत्याही लग्नापूर्वी प्री-वेडिंग फोटोशूट (Pre Wedding Photoshoot) करणं हा एक ट्रेंडचा बनला आहे. लग्नाआधीच्या काही आठवणी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आजकालचे कपल्स प्री वेडिंग शूट करतातच. हे शूट करण्यासाठी कपल्स काहीना काही आउटफीट्सची (Outfits) थीम ठरवत असतात. अशातच अनेक महिलांना त्यांच्या आउटफिट्सबाबत संभ्रम असतो. अशा परिस्थितीत तुम्ही प्री वेडिंग शूट दरम्यान कोणता ड्रेस परिधान करू शकता ते जाणून घ्या.
शॉर्ट ड्रेस
प्री-वेडिंग शूट करण्यासाठी तुम्ही शॉर्ट ड्रेस (Short Dress) निवडू शकता. या प्रकारच्या ड्रेससह तुम्ही तुमच्या केसांचे स्ट्रेटनिंग किंवा लहरी केसांची स्टाईल करू शकता. सोबत हाय हिल्स, बेसिक मेकअप आणि दागिन्यांसह तुम्ही लूक पूर्ण करू शकता.
साडी
प्री वेडिंग फोटोशूटसाठी जर तुम्हाला एथनिक ड्रेस घालायचा असेल तर तुम्ही साडी (Saree) घालू शकता. यासाठी केसांना उंच अंबाड्यात बांधा किंवा उघडे ठेवा. तुम्ही सॅटिनची साडीही निवडू शकता. त्यावर ट्रेडिशनल ज्वेलरी परिधान करून तुमचा लूक पूर्ण करा.
गाऊन
सध्या गाऊन (Gown) ट्रेंडमध्ये आहे. यासाठी केसांना कर्ल हेअर स्टाइल देऊ शकता. स्मोकी आय मेकअप करा. चोकर नेकलेस, बांगड्या आणि मांगे टिक्कासह तुमचा लूक पूर्ण करू शकता.
कॅज्युअल ड्रेस
या फोटोशूटसाठी तुम्ही कॅज्युअल ड्रेसही (Casual Dress) घालू शकता. डेनिम जीन्ससोबत तुम्ही काळा शर्ट किंवा पांढरा टी-शर्ट कॅरी करू शकता. या प्रकारच्या लुकमध्ये तुम्ही फंकी फोटोशूट करू शकता.