भगतसिंह कोश्यारी अखेर पायउतार! महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस कोण आहेत? जाणून घ्या..

मुंबई : (Bhagat Singh Koshyari Resignation accepted) मागील काही महिन्यांपासून महापुरूषांच्या केलेल्या अपमानामुळे माध्यमांच्या चर्चेत असणारे राज्यपाल कोश्यारी आज अखेर आपल्या पदावरून पायउतार झाले आहे. सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा (Resignation) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.

दरम्यान, याबाबतची अधिकृत माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.

कोण आहेत रमेश बैस?
रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 मध्ये छत्तीसगढच्या रायपूरमध्ये झाला.
1978 मध्ये ते सर्वप्रथम नगरपालिकेत निवडून आले होते.
1980 ते 84 मध्ये मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते.
रमेश बैस यापूर्वी झारखंड आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते.
छत्तीसगढ राज्यातील रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा ते खासदार होते.
रमेश बैस यांनी केंद्रातही राज्यमंत्रीपद भूषवले आहे.

भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पत्र लिहिले होते. वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर कोश्यारी यांना मोठा विरोध झाला होता. आज अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.

Prakash Harale:

View Comments (0)