गांधीनगर | Gujarat Election Results 2022 – आज (8 डिसेंबर) गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये भाजपच्या (BJP) 25 वर्षाच्या सत्तेला आप पक्षाकडून सुरूंग लावणार असं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र, प्रत्यक्षात निकाल हाती आल्यावर काँग्रेस आणि ‘आप’च्या पदरात काही पडलेलं पहायला मिळत नाही. तर भाजपने पुन्हा एकदा आपली सत्ता राखत जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे.
भाजपला बहुमत मिळणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. पण, मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? याबाबत विविध नावं चर्चेत होती. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हेच मुख्यमंत्रीपदाची पुन्हा शपथ घेणार आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे. येत्या 12 डिसेंबरला दुपारी 2 वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उपस्थित राहणार आहे.
View Comments (0)