लामा फेरा फाउंंडेशनचा उपक्रम
पुणे : मैत्री दिवस फक्त सामाजिक माध्यमातून साजरा न करता त्याला खरा मैत्रीपूर्ण व्यवहार आणि संबंधाची जोड असणे गरजेचे आहे. कृष्णा आणि सुदामा यांची मैत्री इतिहासातून प्रत्येकाच्या जीवनात उतरली तर समाजात बदल घडल्याशिवाय राहणार नाही. लामा फेरा मॉनेस्ट्रीमध्ये रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा करताना समाज भगिनींना शिक्षणासाठी होत असलेली कसरत दूर करण्यासाठी आम्ही भावांनी सायकल भेट देऊन त्यांचे शैक्षणिक रक्षण करण्यासाठी हातभार लावला. याचा मनस्वी आनंद लामा फेरा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सत्येंद्र शुक्ला यांनी व्यक्त केला.
भारताला आत्महत्यामुक्त करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेली आंतरराष्ट्रीय लामा फेरा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राद्वारे संचालित लामा फेरा फाउंंडेशनच्या पुढाकाराने (स्व.) सिंधूताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन आश्रम, तसेच ममता फाउंडेशन, कात्रज येथील विद्यार्थ्यांसोबत मैत्रीदिवस व रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी बहिणींनी औक्षण करून भावांना राखी बांधली, तर भावांनी रक्षाबंधनाची भेट म्हणून शाळेत जाण्यासाठी सायकल भेट दिली.
आश्रमापासून शाळा दूर असल्याने तसेच येण्या-जाण्यासाठी साधन नसल्याने विद्यार्थ्यांना होत असलेला त्रास व वेळेचा अपव्यय लक्षात घेऊन डॉ. सत्येंद्र शुक्ला, नगरसेवक प्रमोद भानगिरे, रिना शुक्ला, रेवती दामोदरे, प्रशांत कुमार, शैलेश नाळकर, विकास, सारिखा, यशोधन, अंकिता, योगिता भगत, उज्ज्वला, मयूर, सुनीता दाता, जयश्री भोसले, श्रावणी कठाले, इभा, वंदना, शैलेश, रोनक सिंग, उज्ज्वला मुंदडा, सारा, रिया आदींच्या सहकार्याने सायकलीचे वाटप तसेच वस्त्रभेट, अन्नधान्य वाटप करण्यात आले.