गुजरातमध्ये मोठी दुर्घटना! शेकडो लोकांनी भरलेला पूल नदीत कोसळला

गुजरात (MORABI MACCHU RIVER) : गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. गुजरातमधील मोरबीत मच्छू नदीवरील वायरचा पूल पाण्यात कोसळला आहे. यावेळी ४०० ते ५०० लोक पुलावर उपस्थित होते. त्यातील काही लोकांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अनेक लोक पाण्यात पडले आहेत. आज सायंकाळी ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे.

या दुर्घटनेत किती लोक पाण्यात पडले आहेत? किती वाहून गेले आहेत? याबाबत अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. घटना सायंकाळी अंधार पडल्यानंतर घडल्याने बचाव कार्यात अडथळे येत असल्याची माहिती आहे. नदीत कोसळलेला पूल पाचंच दिवसांपूर्वी दुरुस्त करून, तपासून लोकांना रहदारीसाठी खुला केला होता. मात्र, पाचंच दिवसांत मोठी दुर्घटना घडली आहे. हा पूल जुना झाला होता. त्याला दुरुस्त करून नव्याने तो लोकांना रहदारीसाठी खुला करण्यात आला होता.

Dnyaneshwar:

View Comments (0)