पिंपरी चिंचवडकरांसाठी उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, अनधिकृत बांधकामे…

पिंपरी चिंचवड | Pimpri Chinchwad – पिंपरी चिंचवडकरांसाठी (Pimpri Chinchwad) मोठी बातमी आहे. पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. लवकरच याबाबतच्या योजना जाहीर करण्यात येणार आहेत. तसंच सध्या अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर रद्द करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेत शास्ती कर वसूल होतं नसल्याचं लक्षात येतं नाही. मूळ कर देखील वसूल होतं नाही. यामुळे महापालिकेचं मोठं नुकसान होतं आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली आहे. शास्ती कर आम्ही रद्द करत आहोत. सध्या अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर रद्द करण्यात आला आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार अधीन राहून कारवाई होणार आहे. त्यासाठी लवकरच योजना जाहीर करणार असून कोर्टाच्या निर्णयानुसार अधीन राहून कारवाई होणार आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये अनेक बांधकामांना शास्ती कर लावण्यात आला आहे. तसंच शास्तीकराची मूळ रक्कम करापेक्षा जास्त आहे. त्यामुळे शास्तीकर भरणा करण्याबाबत मालमत्ताधारकांमध्ये उदासीनता आहे. शास्तीकर भविष्यात माफ होईल, या अपेक्षेनं मालमत्ताधारक शास्तीकरासह मूळ करही भरत नाहीत.

Sumitra nalawade: