नवी दिल्ली | दहशतवाद्याच्या हत्येनंतर कॅनडानं (Canada) भारतावर (India) गंभीर आरोप केले होते. यापार्श्वभूमीवर भारत सरकारनं कॅनडाला मोठा झटका दिला आहे. भारतानं कॅनडातील लोकांसाठी व्हिसा सेवा निलंबित केली आहे. याबाबतची घोषणा कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालयाच्या व्हिसा सुविधा वेबसाईटवर करण्यात आली आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर बेछूट आरोप केले होते. तसंच कॅनडाकडून एका वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर भारतानं देखील कॅनडाला चोख प्रत्युत्तर देत एका वरिष्ठ कॅनडा राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली होती. तर आता भारत सरकारकडून कॅनडातील लोकांसाठी व्हिसा सेवा निलंबित करण्यात आली आहे.
तर कॅनडानं भारतीय राजनैतिक अधिकारी आणि भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणाऱ्या भारतीय समुदाच्या वर्गांना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना कॅनडातील संभाव्य ठिकाणी प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.