सर्वोच्च न्यायालयाचा नवज्योत सिंग सिद्धूला मोठा झटका; म्हणाले…

नवी दिल्ली : तब्बल ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना आज सर्वोच्च न्यायालयानं मोठा झटका दिला आहे. या प्रकरणी न्यायालयानं सिद्धू यांना १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर सिद्धू यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, मी कायद्याचं पालन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मला न्यायालयाचा निकाल मान्य आहे असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, २७ डिसेंबर १९८८ रोजी नवज्योत सिद्धू आणि त्यांचे मित्र रुपिंदर सिंह संधू यांचा पटियाला येथे कार पार्किंगवरून गुरनाम सिंग नावाच्या एका वृद्ध व्यक्तीसोबत वाद झाला होता. या लढाईत गुरनामचा मृत्यू झाला. त्यानंतर सिद्धू आणि त्यांचा मित्र रुपिंदरसिंग संधू यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंजाब सरकार आणि पीडितेच्या कुटुंबाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. १९९९ मध्ये सत्र न्यायालयाकडून सिद्धू यांना दिलासा मिळाला होत्या, मात्र हा खटला फेटाळण्यात आला. आणि सिद्धू यांना १ वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Prakash Harale: