“काहींना अजूनही स्वातंत्र्य मिळणं बाकी…”, बिग बॉस मराठी फेम उत्कर्ष शिंदेची पोस्ट होतेय व्हायरल

मुंबई: utkarsh shinde’s post viral –  प्रसिद्ध मराठी गायक आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष शिंदेनं बिग बॉस मराठीमधून प्रेक्षकांच्या मानत घर केलं. उत्कर्ष हा गायक असून सोबतच तो डॉक्टर, लेखन, संगीत दिग्दर्शन या क्षेत्रातही पारंगत आहे. नुकतीच त्याने सोशल मीडिया एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामधून त्याची सामाजिक बांधिलकी आपल्याला दिसून येईल. उत्कर्षची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

काल 15 ऑगस्टच्या निमित्ताने उत्कर्षने ही पोस्ट शेअर केली आहे. तो त्याच्या गाडीतून बाहेर जात असताना एका ठिकाणी सिग्नलवर त्याची गाडी थांबली. उत्कर्षसमोर एक तृतीयपंथी व्यक्ति येऊन थांबली. यानंतर उत्कर्षने त्या व्यक्तिसोबत एक सेल्फी घेत त्याविषयी पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टमधून त्याने तृतीयपंथी लोकांच्या व्यथा आणि त्यांच्या वेदनांबद्दल कळकळ व्यक्त केली आहे.

“आज तुला पाहिलं आणि विचार बदलले… “जो भरा नहीं है भावों से,जिसमें बहती रसधार नहीं ।वह हृदय नहीं है पत्थर है, जिसमें स्वदेश का प्यार नहीं।” राष्ट्रप्रेम सर्वोच्च प्रेम म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तिला आपल्या जन्मभूमी वर निस्वार्थ प्रेम असावे.
आज सिग्नलला माझी कार थांबली आणि समोर तू दिसलीस, तुला पाहून खरंच संकुचित विचारांच्या लोकांना तू आज चपखल उत्तर दिलंस. कोण तू ? कुठली तू ? तू नर ? कि नारी? ,ह्या वरून तुझे परीक्षण आज पर्यंत भवताल च्या बऱ्याच लोकांनी केले असेल. पण तू त्यांच उत्तर “तू प्रथम भारतीय” आहेस हे तू आज तुझ्या पेहेराव्यातूनच नाही तर तुझ्या बोलण्यातून ठासून दाखवलंस. कारची काच मी जेव्हा खाली घेतली आणि तू हसत किती सकारात्मकतेने “साहब भारत माता कि जय हो ” म्हणालीस. आणि पैसे नहीं चाहिये आज आज सिर्फ दुआ दूंगी म्हणत डोक्यावरून हाथ फिरवलास आणि प्रवास भर मी तुझ्यातल्या माणुसकीला ,देश प्रेमाला मनोमन सलाम करत राहिलो. 75व्या स्वातंत्र्य दिनी आज खरंच भासल बुरसटलेल्या भेदभाव मानणाऱ्या,माणसाला माणसापासून दूर ठेवणाऱ्या विचारांपासून काहींना अजूनही स्वातंत्र्य मिळणे बाकी आहे”, असं उत्कर्षनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Sumitra nalawade: