पडत्या काळात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!

मुंबई : (CM Uddhav Thackeray Maharashtra Cabinet Meeting News) बुधवार दि. २२ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. या बैठकीत २०२१ पर्यंतचे राजकीय गुन्हे मागे घेण्यात येणार आहे. सरकार बदलल्यास होणारी अडचण टाळण्यासाठी तडजोड या निर्णयाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

दरम्यान, पार पडलेल्या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व मंत्री उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचे केवळ तीनच मंत्री या बैठकीला उपस्थित होते. यावरुन शिवसेनेचे काही नाराज मंत्री हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहटी येथे आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीला शिवसेनेचे कोणकोणते मंत्री बैठकीला उपस्थित राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित रहिले होते. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील बैठकीला हजर नव्हते. सरकार पडले तर पुढील काळात कार्यकर्त्यांना काही अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणुन हा निर्णय घेण्यात आला आहे असं दिसून येत आहे.

Prakash Harale: