मोठी बातमी! पुणे ATSकडून दहशतवाद्याला अटक

पुणे | Pune ATS – आज (१३ जून) पुणे दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) मोठी कारवाई केली आहे. पुणे दहशतवाद विरोधी पथकानं लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्याला उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथून अटक केली आहे. इनामुल हक असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. हा तरुण जुनैद मोहम्मद आणि लष्कर- ए- तोयबा यांच्या संपर्कात होता. तसंच आज त्याला पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

इनामुल हक हा तरुण मुळचा उत्तर प्रदेशचा (uttarpradesh) आहे. जम्मू काश्मीरमधील (jammu kashmir) दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आलेल्या बुलडाण्यातील जुनैद मोहम्मद या तरुणाला पुणे एटीएसने यापूर्वीच अटक केली होती. जुनैद नंतर आता लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आलेल्या तरुणालाही पुणे दहशवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. सोशल मीडियावरुन बुलडाण्यातील जुनैद मोहम्मद काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आला होता.

दरम्यान, लष्कर- ए- तोयबासाठी काम केलं तर पैसे मिळेल. यावरुन जुनैदला अटक करण्यात आली. जम्मू काश्मीरमधील हा तरुण एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचं उघड झालं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून काश्मीर संघटनेच्या संपर्कात आला होता,अशी माहिती आहे. तसंच इनमुलदेखील जुनैदप्रमाणेच वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना दशहतवादाकडे ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे. अधिक चौकशीसाठी एटीएसकडून त्याची कोठडी मागण्यात येणार असल्याची माहिती आहे.

RashtraSanchar: