‘सेल्फी’च्या पहिल्याच दिवशी अक्षयसह चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा धक्का

मुंबई | अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांचा ‘सेल्फी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार हा त्याच्या आगामी सेल्फी या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत होता. शेवटी हा चित्रपट आज 24 फेब्रुवारी रोजी रिलीज झालाय. अक्षय कुमारसाठी 2022 हे वर्ष काही खास नव्हते. 2022 मध्ये त्याचे एका मागून एक असे चित्रपट बाॅक्स ऑवर फ्लाॅप गेले.

कोरोनानंतर अक्षय कुमार याची जादू प्रेक्षकांवर राहिली नसल्याचे दिसत आहे. त्याचे चित्रपट सतत फ्लाॅप जात आहेत. 2022 मध्ये अक्षयचा राम सेतू हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. त्या अगोदर अक्षय कुमार याचा रक्षाबंधन हा चित्रपट ऑगस्टमध्ये रिलीज झाला होता, हा चित्रपट देखील बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप गेला. त्यानंतर आता 2023 मध्ये त्याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झालाय.

सेल्फी या चित्रपटाकडून अक्षयसोबतच चित्रपट निर्मात्यांनी मोठा अपेक्षा आहेत. आता हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सेल्फी या चित्रपटाबद्दल एक अत्यंत मोठी बातमी पुढे येतंय. अक्षय कुमार याच्यासह चित्रपट निर्मात्यांना मोठा झटका लागणार आहे. रिपोर्टनुसार रिलीजच्या अवघ्या काही तासांमध्ये सेल्फी हा चित्रपट लीक झालाय. यामुळे याचा मोठा फटका बॉक्स ऑफिस कलेक्शनवर बसू शकतो. विशेष म्हणजे सेल्फी चित्रपटाची फुल एचडी प्रिंट ऑनलाइन लीक झालीये. त्यामुळे अक्षयसोबतच चित्रपट निर्मात्यांनी मोठा धक्का बसणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.


Dnyaneshwar: