Anantnag Encounter | भारतीय सैन्याला (Indian Army) अनंतनाग (Anantnag) एन्काऊंटरमध्ये मोठं यश आलं आहे. भारतीय सैन्यानं लष्कर-ए-तोएबाचा दहशतवादी उझैर खान याचा खात्मा केला आहे. तर आता अनंतनागमध्ये सुरू असलेली चमकम संपली आहे. त्यामुळे सुरक्षा दलांनी आपलं लक्ष शोध मोहिमेवर केंद्रित केलं आहे.
याबाबत काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितलं की, दहशतवादी उझैर अनंतनागमध्ये मारला गेला आहे. तर आता एका मृतदेहाचा शोध सुरू असून तो दहशतवादी असू शकतो, असा अंदाज विजय कुमार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अनंतनागमध्ये अद्याप शोध मोहीम सुरू आहे. तर या चकमकीत चार जवान शहीद झाले आहेत.
अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत, तर चार जवान शहीद झाले आहेत. आता लष्कराकडून तिसऱ्या दशतवाद्याच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे लष्करानं संपूर्ण परिसराला वेढा घातला असून ते जंगलातील दहशतवाद्यांचा शोध घेण्यात व्यस्त आहेत.
एडीजीपी विजय कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, सध्या शोध मोहीम सुरूच राहणार आहे, कारण अनेक भाग अजून शिल्लक आहेत. त्यामुळे आम्ही लोकांना त्या भागात न जाण्याचं आवाहन केलं आहे. तसंच आम्हाला दोन ते तीन दहशतवाद्यांची माहिती होती. आता आम्हाला तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह कुठेतरी सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही शोध मोहीम सुरू ठेवणार आहोत.