मुंबई | छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉस 16 (Bigg Boss 16) आता अंतिम टप्प्यात आला आहे. शोच्या फिनालय आता अवघे काही आठवडे बाकी आहेत. बिग बॉसचा 16 वा सीझन जिंकण्यासाठी सर्व स्पर्धक मेहनत घेत आहेत. यंदाची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. यंदाच्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) होणार असं सगळ्यांना वाटतं. पण आता एक फोटो व्हायरल होत आहे ज्याच शिव ठाकरे नाही तर दुसऱ्याच स्पर्धकाच्या हातात बिग बॉसची ट्रॉफी दिसत आहे.
या पर्वाच्या टॉप पाच स्पर्धकांची नावे समोर आली. त्यातून निम्रत कौर बाहेर पडली. आता शिव ठाकरे, अर्चना गौतम(Archana Gautam), एम सी स्टॅन(MC Stan), शालीन भनोट(Shalin Bhanot)आणि प्रियांका चौधरी (Priyanka Chahar Choudhary) या चार जणांमध्ये ‘बिग बॉस 16’चा ग्रँड फिनाले रंगणार आहे. आता या चार जणांमधून विजेतेपद शिव ठाकरेला मिळावा अशी अनेकांची इच्छा आहे. परंतु बिग बॉसच्या आधीच्या पर्वाची स्पर्धक अर्शी खान हिने फिनाले आधीच ‘बिग बॉस 16’ च्या विजेत्याचं नाव आणि फोटो शेअर केला आहे.
बिग बॉसची माझी स्पर्धक अर्शी खानने प्रियांका चहर चौधरीचा एक फोटो ट्वीट केला. विशेष म्हणजे या फोटोमध्ये प्रियांकाच्या हातात बिग बॉस ची ट्रॉफी दिसत आहे. त्यामुळे शिव ठाकरेला मागे टाकत ‘बिग बॉस 16’ची विजेती प्रियांका चहर चौधरी झाल्याच्या चर्चा आता रंगल्या आहेत. या ट्विटवर नेटकरी आणि बिग बॉसचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. यावर कमेंट करत अनेकांनी प्रियांकाचं अभिनंदन केलं आहे. परंतु ती खरच ‘बिग बॉस 16’ ची विजेती झाली का हे दोन दिवसातच समजणार आहे.