सर्वांचा लाडका छोटा भाईजान अब्दू रोजिक लवकरच रिअॅलिटी शोमध्ये झळकणार

अब्दू रोजिक (Abdu Rozik) ‘बिग बॉस 16’ (Big Boss) मधील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक होता. त्याच्या परफॉर्मन्सने सुरुवातीपासून शेवटपर्यंत चाहत्यांचं मनोरंजन केलं. मात्र, 14 जानेवारी 2023 रोजी अब्दूने कामाच्या कमेटमेंटमुळे स्वेच्छेने शोमधून एक्झिट घेतली. शोमधून बाहेर पडताच अब्दूने त्याचं हिंदी गाणं ‘प्यार’ लाँच केलं. हे गाणं त्याच्या चाहत्यांना खूप आवडलं. सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटात अब्दू दिसणार असल्याचेही बोलले जात आहे. त्याचप्रमाणे बिग बॉसमधून बाहेर येताच अब्दुला आता एका आंतरराष्ट्रीय रिअॅलिटी शोसाठी ऑफर आली आहे. 

अब्दू रोजिकला मिळाला नवीन रिअॅलिटी शो 

अब्दू रोजिकला एका आंतरराष्ट्रीय रिअॅलिटी शोची ऑफर मिळाली आहे असे म्हटले जात आहे. हा रिअॅलिटी शो यूके स्थित ‘बिग ब्रदर यूके’ (Big Brother UK) आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस 16’ नंतर, अब्दुला ‘बिग ब्रदर यूके’ च्या पुढील सीझनसाठी ऑफर मिळाली आहे. अब्दूने ही ऑफरदेखील स्विकारली अशी माहिती मिळतेय. अब्दू याचवर्षी जून किंवा जुलैमध्ये या शोचा भाग बनू शकतो. ‘बिग ब्रदर युके’ 5 वर्षांनंतर पुन्हा कमबॅक करत आहे.  त्याच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे.

Dnyaneshwar: