“विजयी भव शिव ठाकरे” या हॅशटॅगने सध्या ट्विटरवर धुमाकूळ घातलाय

मुंबई | बिग बॉस 16 (Bigg Boss) च्या विजेत्याच्या नावाची घोषणा काही दिवसांत केली जाणार आहे. टॉप 3 मध्ये पोहोचण्यासाठी सर्व स्पर्धकांमध्ये युद्ध सुरू झाले आहे. बिग बॉसची ट्रॉफी कोण घेईल याचा खुलासा लवकरच होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर शिव ठाकरे (Shiv Thakare), प्रियांका चौधरी (Priyanka Chahar Choudhary) आणि एमसी स्टेन (MC Stan) यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. अर्चना गौतमही (Archana Gautam) अंतिम फेरीत कायम आहे. प्रत्येकाचे चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सला जिंकण्यासाठी प्रसिद्धी देत ​​आहेत. पण सध्या सोशल मीडियावर एक नाव जोरदार चर्चेत आहे. त्या नावाचा हॅशटॅग सुद्धा सोशल मीडियावर ट्रेंडिंगला येत आहे.

“विजयी भव शिव ठाकरे” (“VIJAYI BHAVA SHIV THAKARE”) या हॅशटॅगवर तब्बल ‘चार लाख’ ट्विट पडलेले दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील शिव ठाकरेची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. मराठी बिग बॉसचे दुसरे पर्व जिंकल्यानंतर शिवने एक मोठा चाहतावर्ग कमावला आहे. बॉस फेम शिव ठाकरे यांच्या चाहत्यांनी सध्या ट्विटर एक ट्रेंड सुरु केला आहे. “VIJAYI BHAVA SHIV THAKARE” असा ट्रेंड सध्या ट्विटरवर चालू आहे. नेटकऱ्यांनी या ट्रेन्डला चांगेलचं पकडून ठेवलं आहे.

ट्विटरवर ‘जनता की जान प्रियांका’ (Janta Ki Jaan Priyanka) ट्रेंड सुरू झाल्यावर शिव ठाकरेंच्या चाहत्यांनी “विजयी भव शिव ठाकरे” (“VIJAYI BHAVA SHIV THAKARE”) हा ट्रेंड सुरू केला. शिवला बिग बॉसच्या अतिशय प्रबळ स्पर्धकांपैकी एक मानले जाते. त्याच्या गेम प्लॅनचे अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केले आहे. शिव ठाकरेच्या चाहत्यांनीही त्याला बिग बॉसचा विजेता घोषित केले आहे. “विजयी भव शिव ठाकरे” या ट्रेंडला शिव ठाकरेच्या फॅन क्लबकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Dnyaneshwar: