Bigg Boss 16 : शिव ठाकरे झळकणार सलमानच्या चित्रपटात; चर्चांना उधान

Bigg Boss 16 : मराठमोळा शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या सगळ्यांच्याच मनावर राज्य करत आहे. ‘रोडीज’, ‘बिग बॉस मराठी’ आणि आता ‘बिग बॉस’ हिंदीनंतर आता शिव ठाकरे चांगलाच चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये उत्तम खेळ खेळत शिवने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. शिवची घरातील इतर सदस्यांशी असलेली मैत्रीही प्रचंड लोकप्रिय आहे. आता ‘बिग बॉस १६’ चा फिनालय जवळ आला असून शिव ठाकरेच या पर्वाची ट्रॉफी जिंकणार असं अनेकांना वाटत आहे. आता अशातच बिग बॉसमधील त्याने केलेल्या कामगिरीमुळे त्याला एक मोठा बॉलिवूड चित्रपट मिळत असल्याच बोललं जात आहे.

टेलिचक्करच्या रिपोर्टनुसार, मराठमोळा शिव ठाकरे हा किंग खान सलमानच्या (Salman Khan) चित्रपटात झळकणार आहे. आगामी काळात सलमान खान ‘किसी का भाई किसी की जान’, ‘टायगर 3’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या दोन पैकीच एका चित्रपटात शिवही झळकेल असं बोललं जात आहे. त्या चित्रपटात शिवची महत्वपूर्ण भूमिका असेल. यापैकी नक्की तो कोणत्या चित्रपटात दिसणार आहे हे मात्र समजलेलं नाही. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून अनेक स्टार्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. अब्दु रोजिकही या चित्रपटात दिसणार हे काही दिवसांपूर्वीच समोर आले आहे. तर त्यानंतर आता शिव ठाकरे देखील सलमानच्या चित्रपटात दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

Dnyaneshwar: