‘बिग बाॅस 16’ फेम श्रीजिता डे बाॅयफ्रेंडसोबत अडकणार लग्नबंधनात, ‘या’ दिवशी पार पडणार शाही विवाहसोहळा

मुंबई | Sreejita De Wedding – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री, ‘बिग बाॅस 16’ (Bigg Boss 16) फेम श्रीजिता डे (Sreejita De) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ती तिचा जर्मन बाॅयफ्रेंड मायकल ब्लोम पेपलासोबत (Michael Blohm Pape) लग्नगाठ बांधणार आहे. तसंच श्रीजितानं तिच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर तिचे चाहतेही खुश झाले आहेत.

श्रीजितानं तिच्या लग्नाबाबत स्वत: माहिती दिली आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये श्रीजिता म्हणत आहे की, “माझा वेडिंग गाऊन तयार आहे. येत्या 1 जुलैला मी लग्न करणार आहे.” श्रीजितानं केलेल्या या घोषणेमुळे तिचे चाहते आनंदी झाले असून त्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

श्रीजिता आणि मायकल जर्मनी रीती-रिवाजानुसार लग्न करणार आहेत. त्यांचा लग्नसोहळा जर्मनीमधील हॅम्बर्गमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर त्यांचा शाही विवाहसोहळा गोव्यात बंगाली रीती-रिवाजानुसार पार पडणार आहे. तसंच श्रीजिता- मायकल हनीमूनला मालदीवला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Sumitra nalawade: