पहिल्यांदाच 5 तास चालणार ‘बिग बॉस 16’ चा ग्रँड फिनाले, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे पाहू शकता

Bigg Boss 16 : रिअॅलिटी शो बिग बॉस 16 चा ग्रँड फिनाले अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. बिग बॉसच्या घरात उपस्थित असलेल्या टॉप 5 स्पर्धकांमधून ही ट्रॉफी कोणाला मिळणार, हे 12 फेब्रुवारीला संध्याकाळी कळणार आहे. यावेळचा ग्रँड फिनाले मागील सीजनपेक्षा खूपच वेगळा आणि धमाकेदार असणार आहे. निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी एका खास संध्याकाळची व्यवस्था केली आहे ज्यात एक प्रकारचा परफॉर्मन्स दिला जाईल. बिग बॉसचा ग्रँड फिनाले दोन-तीन तासांचा नसून पूर्ण पाच तास चालण्याची ही पहिलीच वेळ असेल.

12 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये काहीतरी खास असल्याच सांगितलं जात आहे. निर्मात्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून त्याची झलकही दाखवली आहे. ग्रँड फिनालेमध्ये माजी स्पर्धक त्यांच्या आवडत्या सहकाऱ्याना प्रोत्साहन देण्यासाठी येणार आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तो एक रोमांचक डान्स परफॉर्मन्सही होणार आहे. इतकेच नाही तर सध्याचे स्पर्धकही प्रेक्षकांसाठी अनेक गाण्यांवर नाचताना दिसणार आहेत.

5 तास चालणार ग्रँड फिनाले एपीसोड

बिग बॉस 16 चा ग्रँड फिनाले 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. हे पहिल्यांदाच घडत आहे जेव्हा शेवटचा भाग पाच तास चालेल. यादरम्यान शालीन भानोतपासून अर्चना गौतमपर्यंत नवीन-जुने सर्व प्रकारच्या गाण्यांवर परफॉर्म करताना दिसणार आहेत.

बिग बॉस 16 चा ग्रँड फिनाले एपीसोड कधी आणि कुठे पाहू शकता?

बिग बॉस 16 चा फिनाले रविवारी कलर्स चॅनलवर संध्याकाळी 7 ते 12 या वेळेत पाहता येईल. या सीझनचा शेवटचा एपिसोड सलमान खान होस्ट करणार आहे. त्याबरोबरच तुम्ही Voot अॅपवर देखील हा शो पाहू शकता.

Dnyaneshwar: