‘हा’ आहे बिग बॉस 16 चा विजेता? ग्रँड फिनाले आधीच विजेत्याचा फोटो व्हायरल, सर्वांनाच बसला आश्चार्याचा झटका

Bigg Boss 16 Winner : छोट्या पडद्यावरील चर्चित आणि तितकाच वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस 16’ चा आज ग्रँड फिनाले अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वाचा विजेता कोण होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना फिनाले आधीच विजेत्याचा फोटो सोशल मीडियावर ‘बिग बॉस 16’ च्या व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेता सलमान खान विजेत्याचा हात उंचावताना दिसत आहे.

बिग बॉस 16 चा विजेता कोण, ही प्रतीक्षा अखेर आज संपणार आहे. बिग बॉसचे चाहते सीझन 16 च्या फिनालेसाठी खूप उत्सुक आहेत. प्रियांका चहर चौधरीचा बिग बॉस ट्रॉफीसोबतचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तर, दुसरीकडे शिव ठाकरे जिंकल्याच्याही पोस्ट चर्चेत यासोबतच एमसी स्टॅनचा बिग बॉसच्या ट्राफीसोबतचा फोटोही जोरदार चर्चेत आहे. बिग बॉसचा अंतिम सोहळा आज रात्री पार पडणार आहे.

बिग बॉस 11 ची स्पर्धक आणि अभिनेत्री अर्शी खानने (Arshi Khan) तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर फोटो पोस्ट केला. अर्शी सातत्याने प्रियांकाला पाठिंबा देत हा फोटो शेअर केला आहे. अलीकडेच एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, “तीन ट्रेंड एकत्र चालत आहेत.. प्रियंका माझ्यासाठी ट्रॉफीची खरी दावेदार तूच आहे.” त्यामुळे दावे तर खूप होत आहेत पण, बिग बाॅस 16 खरा विजेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या प्रतीक्षेची वेळ देखील काही तासांवर आहे आहे.

Prakash Harale: