मनोज जरांगे झाले हिरो! आयुष्यावर निघणार रिअॅलिटी शो, निर्मात्यांची थेट अॅक्टिंगची ऑफर?

मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ११ दिवसांपासून उपोषण करीत आहेत. आंदोलनामुळं मनोज जरांगे पाटील यांच नाव देशभर गाजत आहे. अशातच आता त्यांच्या आयुष्यावर बायोपिक येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मनोज जरांगे यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर पाहाण्याची इच्छा आंदोलनातल्या कार्यकर्त्यांनीही व्यक्त केली होती. आता या चित्रपटाच्या चर्चेवर खुद्द मनोज जरांगे यांनी भाष्य केलंय.

मनोज जरांगे यांनी मीडिया प्रतिनिधींशी संवाद साधताना जरांगे यांनी त्यांच्या स्टाइलमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिली, की त्याची चर्चा सुरू आहे. ‘हा नवीनच ताप आलाय तो एक. इथंपर्यंत आलाय आता. पहिलेच उत्तर देऊन.. देऊन मी बेजार झालोय. ते लोक अचानक आले. मला वाटलं आंदोलनाला पाठिंबा द्यायला आले असतील. त्यांनी सिनेमाबद्दल बोलणं सुरू केलं. पण ही त्यांची भावना आहे. त्यावर मी काय बोलणार. आमच्याकडून, मराठा समाजाच्यावतीनं त्यांना शुभेच्छा.. असं जरांगे म्हणाले.

तसंच सिनेमाबद्दल बोलणाऱ्या त्या लोकांनी सिनेमात काम करणार का? असंही विचारलं होतं, असं जरांगेंनी सांगितलं. यावर बोलताना म्हणाले की, मला कसं करता येईल ते… तुमचं तुम्ही करा म्हटलं…आमच्या शुभेच्छा आहेत.

Prakash Harale: