सर्वच धार्मिक गटांतील जन्मदर होतोय कमी

नवी दिल्ली : बाळंतपण ही नैसर्गिक क्रिया असली तरी काही बाळंतपणांत आई व जन्मणारे मूल यांना त्रास होऊ शकतो व दर हजार प्रसूतीमागे ३-४ माता मृत्युमुखी पडतात व अनेक आजारी होतात. अवघड बाळंतपणात बाळालाही इजा होण्याची शक्यता असते. म्हणूनच आई व बाळासाठी बाळंतपण निर्धोक करणे हे महत्त्वाचे आहे.

कौटुंबिक हिंसाचारात वाढ
देशातील ७९ टक्के महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी आहेत. ७९.४ टक्के स्त्रिया आपल्या नवर्‍याच्या अत्याचाराबाबत कधीही तक्रार करत नाहीत. लैंगिक अत्याचाराच्याबाबतीत तर परिस्थिती आणखी वाईट आहे. तसेच गर्भनिरोधक करणे हे स्त्रियांचे काम असल्याचा ३५ टक्के पुरुषांचा विश्वास आहे. ज्या महिला गर्भनिरोधक वापरतात ते विनामूल्य असू शकतात असा १९.६ टक्के पुरुषांचा विश्वास आहे.

बाळंतपण व्यवस्थित पार पडेल, याची काळजी गरोदरपणापासूनच घ्यावी लागत असते. लोकसंख्या वाढत आहे, कमी आहे की स्थिर आहे, याबाबत अनेक प्रश्न रेंगाळत असतानाच नॅशनल फॅमिली हेल्थच्या अहवालानुसार देशात बाळंतपणाचे प्रमाण कमी झाल्याचे समोर आले आहे. देशातील बाळंतपणाचा दर २.२% वर आला आहे. प्रजननदरानुसार मुले कमी जन्माला येत असून, सर्व धर्मांमध्ये ते पूर्वीपेक्षा कमी आहे, मुलींच्याबाबतीत देशातील विचार बदलत आहेत. देशात दोन मुली असलेल्या ६५ टक्के स्त्रिया आहेत, ज्यांना मुलगा हवाच अशी आसही नाही.

बिहार, मेघालय, उत्तर प्रदेश, झारखंड व मणिपूर या पाच राज्यांत प्रजननदर २.१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सर्व धार्मिक गटांमध्ये कमी मुले जन्माला येत असून, २०१५-२०१६ मध्ये आयोजिलेल्या चौथ्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण व पाचव्या २०१९-२१ मध्ये आठवड्याच्या सुरुवातीला जारी करण्यात आलेला अधिकृत डेटा दर्शविण्यात आला होता.

Dnyaneshwar: