Bishan Singh Bedi Passed Away : भारतामध्ये विश्वचषक सुरु असतानाच क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिशनसिंह बेदी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसरमध्ये झाला होता. 1966 ते 1979 पर्यंत त्यांनी भारतीय संघासाठी कसोटी सामने खेळले आहेत. 22 कसोटी सामन्यात त्यांनी टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे.
बिशन सिंह बेदी 1970 च्या शतकात स्पिन गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी 22 टेस्ट सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून जबाबदार सांभाळली होती. बिशन सिंह बेदी याची भारतीय टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्तम स्पिनर्समध्ये गणना केली जायची. त्यांनी टीम इंडियासाठी 77 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये त्यांनी 273 बळी घेतले होते.
बिशन सिंह बेदी यांनी पंजाब संघाकडून क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. बिशन सिंह बेदी 1968 मध्ये दिल्ली रणजी संघात सामील झाले. त्यानंतर ते अनेक वर्षे दिल्ली रणजी संघाचा भाग होते. बिशन सिंह बेदी यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. बिशन सिंह बेदी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द एका दशकाहून मोठी होती. त्यांनी सुमारे 12 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं.