भाजपाकडून विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर; पंकजा मुंडेंचा पत्ता कट

मुंबई : (BJP Leader On Pankaja Munde) भाजपाकडून आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहे. राजकिय वर्तूळात या यादीत पंकजा मुंडे यांचे नाव निश्चित मानले जात असतानाच मात्र, पंकजांना यावेळीही पक्षाकडून हुलकावणी देण्यात आली आहे. भाजपाकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे तसंच उमा खापरे, श्रीकांत भारतीय या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यसभा तसंच विधान परिषदेसाठीही पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र राज्यसभेतही पंकजांना उमेदवारी डावलण्यात आली. राज्यसभेसाठी भाजपाने पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. त्यावेळी त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, भाजपाने उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या नव्या चेहऱ्यांना यंदा विधान परिषदेसाठी संधी दिली आहे. उमा खापरेंच्या रुपाने महिला मोर्चाच्या नेतृत्वाला प्रतिनिधित्व मिळालं आहे. तर प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. पंकजा मुंडेंच्या नावासाठी देवेंद्र फडणवीसांनी खूप प्रयत्न केल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मुंडे यांचे नाव यादीतून वगळल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

Prakash Harale: