भाजपकडून राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी महिलेला संधी

President Election | राज्यसभेनंतर महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणूक पार पडली आहे. त्यानंतर आता राष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणूकीची चाहूल लागली आहे. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक मतदान 18 जुलै 2022 रोजी होणार आहे आणि मतमोजणी 21 जुलै 2022 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारी कॉंग्रेस आणि भाजपकडून उमेद्वार जाहीर करण्यात आलेले आहेत.

भाजपकडून द्रोपदी मुर्मू (Dropadi Murmu) यांना संधी देण्यात आली आहे. मुर्मू या आदिवासी भागातून आलेल्या आहेत. त्यामुळे आता भारताला एक आदिवासी महिला राष्ट्रपती पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यांच वय ६४ वर्षे आहे. मुर्मू या झारखंड राज्याच्या माजी राज्यपाल राहिलेल्या आहेत. द्रोपदी मुर्मू या भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेद्वार असतील अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली.

नुकतंच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. यशवंत सिन्हा यांच नाव राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसकडून घोषित करण्यात आलं आहे.

Dnyaneshwar: