भाजपने केली राज्यसभेसाठी ‘या’ दोन उमेदवारांची घोषणा; तिसऱ्या नावासाठी अजून प्रतीक्षा

भाजप कडून आज देशभरातील राज्यसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रातून यामध्ये कोणती नावे समोर येतील याबाबत चर्चा सुरु होती. दरम्यान आता , महाराष्ट्रातून भाजपकडून दोन उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. तिसऱ्या नावासाठी अजून सस्पेन्स ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्रातून पियुष गोयल आणि अनिल बोंडे या दोन उमेदवारांची भाजपकडून राज्यसभा उमेदवारीसाठी घोषणा करण्यात आली आहे. मात्र तिसऱ्या नावाबद्दल कोणताही निर्णय घेतला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा केली जात आहे. या उमेदवारांच्या घोषणेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

संबंधित पियुष गोयल यांचे नाव अगोदरपासूनच चर्चेत होते मात्र , विदर्भातील नवीन चेहरा म्हणून अनिल बोंडे यांना यावेळी संधी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती भाजपच्या अधिकृत ट्विटर वरून देण्यात आली आहे.

Dnyaneshwar: