कायदा सर्वांना समान, केतकीला शिवीगाळ करणाऱ्यांवर कारवाई अटक करा : चित्रा वाघ

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेला काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केल्याने अटक करण्यात आली. न्यायालयाने तिला १४ दिवसांची कोठडी देखील सुनावली आहे. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्र वाघ यांनी केतकी चितळेला समाजमाध्यमांवर अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या आणि तिला धमक्या देणाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी प्रशासनाला केली आहे.

कायदा सर्वांना समान असतो, असं म्हणत त्यांनी ट्विटर वरील काही अश्लील भाषा वापरून केतकी चितळेला टार्गेट करणाऱ्या पोस्टचे स्क्रिनशॉट त्यांनी आपल्या पोस्टमध्ये टाकले आहेत.

ट्विट मध्ये त्या म्हणाल्या की, ‘केतकी चितळे वर कारवाई झाली आता.. त्याच बरोबर केतकी चितळेला अतिशय अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ..उघड उघड चोपायची/ जीवे मारण्याची भाषा करणाऱ्या मर्दांवर आणि रणरागिणींवर देखील रितसर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी.’

Dnyaneshwar: